jobalertmarathi@gmail.com
| Home
hallticket

Maharashtra Police Bharti Written Exam Hall Ticket 2026 Out - लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

www.JobAlertMarathi.in

Published: 19-05-2026 11 Views


🚨 Official Update

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२६

लेखी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक आणि SRPF पदांसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेचे अधिकृत प्रवेशपत्र महाआयटी (MahaIT) पोर्टलवर जाहीर करण्यात आले आहे. मैदानी चाचणीत (Physical Ground Test) पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता अंतिम टप्प्यासाठी म्हणजेच लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आले आहे.

परीक्षेची तारीख
२० जून २०२६
एकूण गुण
१०० गुण
परीक्षेचा वेळ
९० मिनिटे

हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे?

1
अधिकृत लिंकवर जा

खालील 'Download Hall Ticket' बटनावर क्लिक करा आणि महापोलीसचे अधिकृत पोर्टल ओपन करा.

2
लॉगिन माहिती भरा

तुमचा नोंदणीकृत Email ID (किंवा Application Number) आणि पासवर्ड अचूक टाका.

प्रिंट आऊट काढा

Admit Card ची PDF डाऊनलोड करा आणि त्याची स्पष्ट दिसेल अशी A4 साईझवर प्रिंट (Colour/Black & White) काढा.

अतिमहत्त्वाची सूचना

  • परीक्षेच्या दिवशी ओळखपत्र म्हणून फक्त मूळ (Original) आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा लायसन्स चालणार आहे. झेरॉक्स चालणार नाही.
  • हॉल तिकीटवर दिलेल्या वेळेच्या किमान १ ते दीड तास आधी केंद्रावर हजर राहणे अनिवार्य आहे. उशिरा आल्यास गेट बंद केले जाईल.
  • कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण (स्मार्ट वॉच, मोबाईल, ब्लूटूथ) परीक्षा हॉलमध्ये पूर्णपणे निषिद्ध आहे.

Platform Stats

Total Active Updates: 26